युरोपीयन युनियन रशियाकडून तेल आयातीत दोन तृतीयांश कपात करणार !

युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न

प्रातिनिधिक छायाचित्र

ब्रुसेल्स (बेल्जियम) – रशिया-युक्रेन युद्ध लवकरच १०० दिवसांचा टप्पा गाठेल. या पार्श्वभूमीवर युरोपीयन युनियनने रशियाकडून तेल आयातीत दोन तृतीयांश कपात करण्याचे मान्य केले आहे. युरोपीयन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे रशियावर युद्ध संपवण्यासाठी दबाव निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

१. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी युरोपीयन युनियनला अंतर्गत मतभेद संपवण्याचे आवाहन करत रशियावर आणखी निर्बंध लादले पाहिजेत, अशी आशा व्यक्त केली. झेलेंस्की यांनी रशियन तेलावर बंदी घालण्याची मागणी केली.

२. युरोपीयन युनियनमधील सदस्य देशांतील परस्पर मतभेदांमुळे रशियावरील निर्बंधांची गती मंदावली आहे. हंगेरीने म्हटले आहे की, ते रशियाविरुद्धच्या तेल निर्बंधाचे समर्थन करणार नाहीत.

३. दुसरीकडे रशियाने नेदरलँड्सचा गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मेपासून गॅस पुरवठ्यावर बंदी आणण्यात आली आहे.