आम्ही नव्या ठिकाणांना लक्ष्य करू ! – रशियाची युक्रेनला चेतावणी

प्रतीकात्मक छायाचित्र

मॉस्को (रशिया) – युक्रेनला लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात आला, तर आम्ही काय निष्कर्ष काढायचा तो काढू, तसेच यापूर्वी कधीही आक्रमण न केलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करू. त्यासाठी आमच्याकडील अस्त्रांचा आम्ही वापर करू, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलीे. काही दिवसांपूर्वी ‘आम्ही युक्रेनला ‘हिमर्स मल्टिपल लाँ रॉकेट सिस्टीम’चा पुरवठा करू, असे अमेरिकेने घोषित केले होते.