‘तौक्ते’ चक्रीवादळाचा सातारा जिल्ह्यातील फळबागांना मोठा तडाखा 

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा – माण तालुक्यातील डाळिंब फळबागांना ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून बहार धरलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.

माण तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी डाळिंब फळबागा लावल्या होत्या. तेल्या आणि मर रोगामुळे शेतकर्‍यांना थोडा त्रास झाला; परंतु नव्या जोमाने त्यांनी डाळिंब, आंबा, सीताफळ, संत्रा, पेरू या फळबागांचे मोठे क्षेत्र लागवडीखाली आणले. आता या फळबागा पुन्हा तयार होण्यासाठी भरपूर अवधी लागणार आहे. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण यांमुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.