पालकमंत्री जयंत पाटील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक देतात ! – सांगलीतील शिवसैनिकांची तक्रार

या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन आणि त्यांच्यापुढे आपले गार्‍हाणे मांडीन’, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.

गतीरोधक करण्यासाठी मिरज-माधवनगर रस्त्यावर भाजपच्या वतीने रस्ता बंद आंदोलन

गतीरोधकाच्या मागणीसाठी आमदारांना आंदोलन का करावे लागते ? असे प्रशासन सामान्यांना न्याय काय देणार ?

लाच मागितल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील तलाठी आणि कोतवाल कह्यात

शेतभूमीच्या फेरफारमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच मागणारे तलाठी बेले आणि कळमनुरी तहसील कार्यालयातील कोतवाल शेख हमीद या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले.

आयुष डॉक्टर नेमल्यास रुग्णालयांची मान्यता रहित करण्याची ‘एन्.ए.बी.एच्.’ची चेतावणी !

अ‍ॅलोपॅथी उपचार देणार्‍या रुग्णालयांच्या अतीदक्षता विभागांमध्ये आयुष डॉक्टरांच्या नेमणुका केल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून ही कृती नियम आणि अटी यांचे उल्लंघन करणारी आहे.

मिरज शहरप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केली ५ सहस्र शिवसेना सदस्य नोंदणी !

शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरात शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवले. यात ५ सहस्र सभासदांची नोंदणी करण्यात आली.

कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

अवैध मद्याची वाहतूक करणारे राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या वाहनाला धडक देऊन पसार

अवैध मद्याची वाहतूक करणार्‍यांची मजल कुठपर्यंत गेली, हे राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे अन्यथा वाळू तस्करी करणारे जसे महसूल अधिकार्‍यांवर प्राणघातक आक्रमणे करतात, तशी वेळ त्यांच्यावर आल्यास आश्‍चर्य ते काय ?

आयुर्वेद संशोधन प्रकल्प आडाळी एम्.आय.डी.सी. येथेच होणार ! – खासदार विनायक राऊत, शिवसेना

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम्.आय.डी.सी. येथे आयुर्वेद संशोधन प्रकल्प संमत करण्यात आला; मात्र तो लातूर येथे हालवण्याच्या हालचाली चालू होत्या. या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेद संशोधन प्रकल्प आता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथेच होणार आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य

तालुक्यातील कोंडये येथील सौ. मयुरी मंगेश तेली या ऑक्टोबर २०२० मध्ये अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्या होत्या. सौ. मयुरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाल्यामुळे महसूल विभागाने त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.