राजापूरचे वाहतूक नियंत्रक एस्.टी. सेवेतून बडतर्फ

बनावट शिक्का मारून आणि जादा पैशांची आकारणी करून एस्.टी. पासच्या विक्रीत २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी निलंबित असलेले येथील वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर एस्.टी. सेवेतून बडतर्फ !

वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

वर्ष २०१९ मध्ये एका वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालयाने दंड आणि ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली.

कुडचडे येथे भर बाजारातील दुकाने फोडून चोरी

अज्ञातांनी येथे भर बाजारात असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील ४ दुकाने फोडून आतील रोकड पळवली. विशेष म्हणजे याच इमारतीत वीजमंत्री नीलेश काब्राल वास्तव्य करतात.

ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा

तालुक्यातील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथील नवनाथ उपासक प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या ‘तपोभूमी’ येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा असणार आहे. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र असतांना स्त्रियांसाठी कार्तिकस्वामी दर्शनाचा योग असतो.

कोरोनाची चाचणी न करताच शाळेत उपस्थित झालेले शिक्षक कोरोनाबाधित आढळले

सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा चालू करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करून शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आदेश आहेत; परंतु चाचणी न करताच येथील एका नामांकित माध्यमिक शिक्षण संस्थेत एक शिक्षक २३ नोव्हेंबर या दिवशी शाळेत उपस्थित झाले.

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते धोंडीराम भोपळे-गुडाळकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून ऊस तोडणी कामगारांना दीपावली फराळ वाटप

हिंदुत्वनिष्ठ श्री. धोंडीराम भोपळे-गुडाळकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून बसस्थानक परिसर, तसेच पंचगंगा साखर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांना फराळ वाटप करण्यात आले.

निधन वार्ता

जिल्ह्यातील कांदिवली येथील सनातनच्या साधिका सौ. अनिता विनय शहाणे यांचे पती विनय वसंत शहाणे (वय ५८ वर्षे) यांचे २३ नोव्हेंबरला रात्री दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

पाकिस्तानच्या विरोधातील संतप्त निदर्शनात पाकच्या ध्वजाची होळी

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या तरुणाचे पैशाच्या वादावरून अपहरण !

एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून रिक्शातून त्याला शहरात फिरवले जाते. तरीसुद्धा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही, यावरून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, अशी शंका सामान्य नागरिकांना आल्यास चूक ते काय ? – संपादक

संबंधित दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांना अटक करा !

पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन