
पुणे – अॅलोपॅथी उपचार देणार्या रुग्णालयांच्या अतीदक्षता विभागांमध्ये आयुष डॉक्टरांच्या नेमणुका केल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून ही कृती नियम आणि अटी यांचे उल्लंघन करणारी आहे. त्याचा संबंध थेट रुग्णहित आणि त्यांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे अतीदक्षता विभागातील रुग्णसेवेसाठी अॅलोपॅथीची पदवी असलेल्या निवासी डॉक्टरांऐवजी आयुष डॉक्टरांच्या नेमणुका करणार्या रुग्णालयांची मान्यता रहित करण्याची चेतावणी रुग्णालयांना मान्यता देणार्या ‘नॅशनल अॅक्रे डिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर’ने (एन्.ए.बी.एच्.) दिली आहे. एन्.ए.बी.एच्.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अतुल कोचर यांनी या नोटिसा पाठवल्या आहेत. यावर आयुष डॉक्टरांच्या सक्षमीकरण समितीचे डॉ. मंदार रानडे म्हणाले की, आयुर्वेदीय डॉक्टरांना मिळालेल्या शस्त्रकर्माच्या अनुमतीमुळे अॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटना अशा कृत्यांमधून आपला खेद व्यक्त करत आहेत; मात्र आयुष डॉक्टर असलेल्या रुग्णालयांचे परवाने रहित करण्याचे धोरण असेल, तर राज्यासह देशभरातील रुग्णसेवा कोलमडेल, याचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास