६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात ! – देवेंद्र भुजबळ, माजी राज्य माहिती संचालक

महाराष्ट्र राज्यात सध्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्‍या शासनाच्या सर्व सवलती ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी माजी राज्य माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सानपाडा येथे एका कार्यक्रमात केली.

संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक  

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ स्थानांतर केल्यावर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा सातवा पुण्यतिथी उत्सव ४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत श्री. माधव मामा बारसोडे यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकावर पवमान आणि रूद्राभिषेक केला. त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत पादुका पूजन आणि … Read more

गोव्यामध्ये गांजा विक्रीसाठी निघालेल्या २ धर्मांधांना अटक !

धुळे जिल्ह्यातून शिरपूर येथून दोघे एस्.टी. बसमधून गांजा घेऊन गोव्यात विक्रीसाठी निघाल्याची माहिती खडकी पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून चर्च चौकामध्ये दोघांना अटक केली.

जुन्नर (पुणे) येथे लक्ष्मीपूजनादिनी ६ गोवंशियांची सुटका !

गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ? हिंदूंच्या पवित्र लक्ष्मीपूजनादिनी गोवंशांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !

दिवाळीच्या रात्री फटाके फोडणार्‍या व्यक्तीला भरधाव चारचाकीची धडक !

घायाळाला कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेले असून तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे.

दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली !

पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे.

दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले !

दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. प्रामुख्याने वसूबारस या दिवशी श्री विघ्नहर उद्यानामध्ये असलेल्या गायीचे पूजन करण्यात आले, लक्ष्मीपूजनदिनी श्री विघ्नहराचे अलंकार, तसेच देवस्थान ट्रस्टचे चोपडी पूजन करण्यात आले.

मुंबई : हिंदूंना ‘धर्मांध’ ठरवण्यासाठी टाटा रुग्णालयाबाहेर मुसलमानांचा बनाव !

हिंदूंना धर्मांध ठरवण्यासाठी मुसलमान कशा क्लृप्त्या करतात, हे यावरून लक्षात येते. अशांवर मुंबई पोलीस कठोर कारवाई करणार का ?

रत्नागिरी जिल्ह्यात ७१ वानरांना पकडले : दिवाळीनंतर उर्वरित वानर पकडणार

वानरांच्या त्रासामुळे कोकणामध्ये कडधान्ये, तृणधान्ये, पालेभाज्या, फळबागा करणे नागरिकांनी सोडून दिले आहे. वानरांच्या त्रासामुळे कोकणातील शेकडो एकर भूमी ओसाड पडल्या आहेत. त्यामुळे वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी मागील …