पुण्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा, तसेच डॅशबोर्ड अपडेट करण्यामध्ये विलंब !
पुण्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा असणे, हे चिंताजनक आहे. महापौरांनी यामध्ये जातीने लक्ष घालून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, ही अपेक्षा !
पुण्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा असणे, हे चिंताजनक आहे. महापौरांनी यामध्ये जातीने लक्ष घालून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, ही अपेक्षा !
कुंपणानेच शेत खाल्ल्यास तक्रार कुणाकडे करायची ? भ्रष्ट न्यायाधीश असतील तर जनतेला न्याय मिळेल का ? अशा न्यायाधीशांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांसाठी शासकीय यंत्रणा लवकरात लवकर चालू करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत, या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ६ एप्रिल या दिवशी दिले.
आधुनिक वैद्य मत्ते रुग्णांना पडताळत असतांना हे आक्रमण करण्यात आले. त्यात आधुनिक वैद्य गंभीर घायाळ झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या अनेक ठिकाणी प्रतिदिन ८ घंट्यांपेक्षा अधिक काम करतात, तसेच त्या सुट्टीच्या दिवशीही काम करतात. इतके काम करूनही त्यांना त्याचा पुरेसा मोबदला देण्यात येत नाही.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयातील मगरींचे विलगीकरण करण्यात आले. हे काम करण्यासाठी सहभागी झालेल्या संस्थांमधील काही कार्यकर्त्यांनी मगरीसमवेत स्टंटबाजी करत छायाचित्र काढले, असा आरोप शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केला आहे,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ३ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३० वाजता शिवशक्ती प्रतिष्ठान, कोल्हापूर परिवाराच्या वतीने टाऊन हॉल बाग परिसर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरामध्ये स्वच्छता करून फुलांची सजावट करण्यात आली.
३ एप्रिलपासून पुढील ७ दिवसांसाठी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून यामध्ये पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक करणारी पुणे महानगर परिवहन मंडळाची (पी.एम्.पी.एल्.) सेवा बंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे; मात्र १ सहस्र सिलेंडरची मागणी असतांना ७०० सिलेंडरचा पुरवठा होत आहे.
पुणे महापालिकेच्या घनकचरा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही आग लावली असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.