सनातन संस्था आणि अन्य सेवाभावी संस्था यांचा श्रीफळ देऊन सन्मान

मिरज (जिल्हा सांगली), २६ जुलै (वार्ता.) – येथील वाळवे गल्ली परिसरातील शिव विठ्ठल मंदिराच्या वतीने आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर ‘बाळगोपाळ दिंडी सोहळा’ आणि भक्तीगीतांचा भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचा अनेक महिला आणि पुरुष भक्तांनी लाभ घेतला.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या दिंडीमध्ये विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, वारकरी, भाविक, धर्माभिमानी नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दिंडीत देवता आणि संत यांच्या वेशभूषेत नटलेले बाळगोपाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. संतांच्या पालख्या, घोडे, टाळ-मृदंगाचा गजर आणि फडकणारे भगवे ध्वज यांमुळे संपूर्ण मिरज नगरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेली होती. मिरज मार्केट परिसरात टाळ-मृदंगाच्या तालावर बाळगोपाळांचे नयनरम्य रिंगण पार पडले.
‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे निमंत्रण आणि सत्कार !
या प्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व भाविक आणि धर्माभिमानी यांना आगामी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात आले. दिंडीची सांगता झाल्यानंतर धर्मकार्य आणि समाजकार्य यांत योगदान देणार्या सनातन संस्थेसह विविध सेवाभावी संस्थांचा आयोजकांच्या वतीने श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
नागपूर येथे अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि निकाह !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी कुणाचीही सुटका होणार नाही ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
नियमांचे उल्लंघन करून प्रकल्पांना निधी दिल्यास त्या लेखाशीर्षाचा निधी थांबवणार !