
पुणे – मागील वर्षी खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याची जलसंपदा विभागाने पूर्वकल्पना न दिल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप झाला. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षात पालिकेचे कर्मचारी २४ घंटे नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पत्र दिले होते; मात्र पालिकेने नियुक्ती केली नाही. पाटबंधारे विभागाने कनिष्ठ अभियंता दर्जाच्या कर्मचार्यांची नियुक्तीची मागणी केली आहे. त्यामुळे पूरस्थितीची माहिती वेळेत पोचेल; मात्र पालिकेने कर्मचारी नियुक्त केले नाहीत. (पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचा फटका एकता नगरीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे. – संपादक)
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
नियमांचे उल्लंघन करून प्रकल्पांना निधी दिल्यास त्या लेखाशीर्षाचा निधी थांबवणार !
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
गोमाता रक्षणासाठी २७ जुलैला देशव्यापी ‘गो सन्मान’ अभियान !