वणी येथील आधुनिक वैद्य मत्ते यांच्यावर चाकूने आक्रमण

वणी (यवतमाळ), ६ एप्रिल (वार्ता.) – येथील रामपुरामधील श्री नृसिंह मंदिराजवळील चिकित्सालयात ५ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्य पद्माकर मत्ते यांच्यावर अज्ञातांकडून धारदार चाकूने आक्रमण करण्यात आले. आधुनिक वैद्य मत्ते रुग्णांना पडताळत असतांना हे आक्रमण करण्यात आले. त्यात आधुनिक वैद्य गंभीर घायाळ झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले. आक्रमणाचे कारण अजून समजले नाही.

स्थानिक आधुनिक वैद्यांच्या संघटनांकडून या घटनेचा निषेध म्हणून ६ एप्रिल या दिवशी १ दिवसाचा वणी बंद पाळण्यात आला. ‘अज्ञात आक्रमणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करू’, असे ठाणेदार वैभव जाधव यांनी म्हटले आहे.