विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची दोषींवर कारवाई करण्याची मागणी
सोलापूर – काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयातील मगरींचे विलगीकरण करण्यात आले. हे काम करण्यासाठी सहभागी झालेल्या संस्थांमधील काही कार्यकर्त्यांनी मगरीसमवेत स्टंटबाजी करत छायाचित्र काढले, असा आरोप शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याविषयी जिल्हाधिकारी, वन विभाग आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.
मगरींच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण रहावे, यासाठी नर आणि मादी मगरींचे काही दिवसांपूर्वी विलगीकरण करण्यात आले. या वेळी या कामासाठी काही पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या. काही कार्यकर्त्यांनी मगरीसमवेत स्टंटबाजी करत काढलेली छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांमध्येही प्रसारित करण्यात आली होती. या प्रकारामुळे मगरींच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.