धुळे – येथील शिरपूर भागात सव्वा दोन एकर गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. यात २ सहस्र ८१६ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत ५.६३ कोटी रुपये आहे. गांजाची शेती करणारा किरण कोळी फरार आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने ही झाडे उद्ध्वस्त केली.