रुग्णसेवा प्रकल्प मिरज यांच्याकडून श्री संत वेणाबाई मठ गोशाळेत चारा वाटप

रुग्णसेवा प्रकल्प मिरज यांच्याकडून श्री संत वेणाबाई मठ गोशाळेत चारा वाटप

या वेळी श्री. महादेव जोगळेकर यांच्या हस्ते मठाधीश पू. कौस्तुभ महाराज यांना एक सहस्र रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच या उपक्रमासाठी ‘महा एन्.जी.ओ. फेडरेशन पुणे’ आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांचे सहकार्य लाभले.

हरिपूर येथील श्री संगमेश्‍वर मंदिरात नृसिंह जयंतीच्या निमित्ताने चंदनाच्या (गंधाची) उटीने करण्यात आलेली श्री नृसिंह अवतार स्वरूपातील विशेष पूजा.

निधन वार्ता !

निधन वार्ता !

सनातनचे साधक रामचंद्र गंगाराम खुस्पे (वय ६५ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने २४ मेच्या रात्री १२ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, १ मुलगा, सून, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

कोरोना नियमावलीचा अवलंब करत ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा !

कोरोना नियमावलीचा अवलंब करत ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा !

गत ७ वर्षांपासून चालू असलेली ‘शिवसमर्थ प्रेरणा दिना’ची परंपरा या वर्षीही अखंडित राहिली आहे. कोरोना नियमावलीचा अवलंब करत २४ मे या दिवशी चाफळ येथील श्रीराम मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शिंगणवाडी येथे नेत मोठ्या उत्साहात ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ साजरा केला.

संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यात विलंब !

संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यात विलंब !

मृत्यूनंतर देयक न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला, तर ‘देयक भरून मृतदेह कह्यात घेण्यासाठी नातेवाईक पुढे न आल्याने विलंब झाला आहे’, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी १ जूनअखेर वाढवली ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी १ जूनअखेर वाढवली ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

या कालावधीत शेतीविषयी सेवा आणि शेती चालू रहाण्यासाठी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे अन् त्यांची दुरुस्ती, देखभाल पुरवणार्‍या सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू रहातील.

खेड (पुणे) तालुक्यातील शाळेच्या आवारात मद्याची पार्टी करणार्‍यांना अटक  

खेड (पुणे) तालुक्यातील शाळेच्या आवारात मद्याची पार्टी करणार्‍यांना अटक  

दळणवळण बंदीच्या काळात सर्व दुकाने बंद असतांना पार्टी करण्यासाठी दारू कुठून मिळाली, याचा शोध घेऊन संबंधितांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे.

भुईंज (सातारा) येथे राजकीय हितसंबंधातून सार्वजनिक मालमत्तेचा अपहार

भुईंज (सातारा) येथे राजकीय हितसंबंधातून सार्वजनिक मालमत्तेचा अपहार

भुईंज ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह १८ सदस्यांनी ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता त्रयस्तांना हस्तांतरीत केली.

कोलगाव येथील आय.टी.आय. कारागृहातील आरोपी पसार

कोलगाव येथील आय.टी.आय. कारागृहातील आरोपी पसार

कारागृहातील आरोपी प्रमोद परब पहाटे पसार झाल्याचे उघड झाले. 

कोरोनाच्या काळात अंबरनाथ-बदलापूर विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे रुग्णांना साहाय्य !

कोरोनाच्या काळात अंबरनाथ-बदलापूर विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे रुग्णांना साहाय्य !

कठीण प्रसंगात रुग्णसेवा करून त्यांना आधार देणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श अन्य समाजसेवी संघटनांनीही घ्यावा !