एक लाख रुपयांची लाच घेणारा साहाय्यक निरीक्षक पोलिसांच्या कह्यात !
फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.
फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास साहाय्य करण्यासाठी लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह संतोष खांदवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.
सनातनच्या साधिका श्रीमती सुप्रिया कदम यांच्या आई श्रीमती सावित्री बाळकृष्ण देसाई यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव या गावी ८ सप्टेंबर या दिवशी पहाटे ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
अशी तत्परता सर्व प्रशासकीय कामकाजात आल्यास व्यवस्था पालटायला वेळ लागणार नाही ! रेल्वे प्रशासनाने अशी तत्परता सर्व कामकाजात आणल्यास रेल्वेच्या कारभाराची प्रतिमा उंचावेल !
वारंवार घडणार्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेसह समाजाला नीतीवान बनवण्यासाठी साधना शिकवणेही आवश्यक आहे !
८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेन्द्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यात वाद निर्माण होऊन २ गटात तुंबळ हाणामारी झाली.
शहरात ७ सप्टेंबर या दिवशी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे येथील व्यापारी संकुलात पाणी शिरले आहे. यामुळे दुकानात असणार्या शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्या असून मूर्तीकारांची अनुमाने दीड लाख रुपयांची हानी झाली आहे.
जागृत गणेशभक्तांकडून प्रबोधन !
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपति पंचायतन संस्थानचा उत्सव साध्या पद्धतीने होणार आहे. १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते दरबार हॉल येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
सनातनच्या साधिका सविता भारत चौधरी यांचे पती भारत सुदाम चौधरी (वय ५७ वर्षे) यांचे ७ सप्टेंबर या दिवशी पुणे येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
राधानगरी, गगनबावडा आणि करवीर तालुका येथे जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतीवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.