
बाराबंकी (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात प्रार्थनासभा, प्रेमाचे जाळे आणि विवाहाचे अमिष दाखवून केले जाणारे धर्मांतराचा प्रकार ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे. गेल्या एका महिन्यात रामनगर आणि देवा परिसरात अशी दोन प्रकरणे समोर आली. दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली.
एका प्रकरणात रामनगर येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे हळूहळू बुद्धीभेद करून तिचे मन न्यायालयीन मार्गाने विवाह (कोर्ट मॅरेज) साठी वळवण्यात आले. यानंतर त्या मुलाचे धर्मांतर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या प्रकरणातील मुसलमान आरोपीला वेळीच अटक करण्यात आली.
दुसर्या प्रकरणात गेल्या महिन्यात ९ मे या दिवशी देवा गावातील कस्बा इचौली येथे एका विवाहित हिंदु महिलेला, तसेच तिचा पती आणि सासू यांना बलपूर्वक एका घरात नेऊन धर्मांतर अन् निकाह करण्यासाठी दबाव आणला गेला. पोलिसांनी या प्रकरणी मकसूद आणि अमन यांना अटक केली. वेळोवेळी मिळालेल्या तक्रारींनुसार सफदरगंज, हैदरगड, कुर्सी, फतेहपूर आणि घुंघटेर या भागांतही अशा प्रकारची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत.
अशा प्रकरणात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही ! – पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, जिल्ह्यात अशा प्रकारच्या हालचालींवर सातत्याने बारीक लक्ष ठेवले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !