पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर

पंढरपूर – पंढरपूर-सातारा महामार्गावर टेंपो विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कार्तिकेयन एस्. यांनी संबंधित अधिकार्‍यांसह अपघात प्रवण क्षेत्राची प्रत्यक्ष पहाणी केली. सातारा महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगतच्या अपघातप्रवण ठिकाणी तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्. यांनी ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ला दिल्या, तसेच तांदुळवाडी परिसरातील धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे उभारण्याचे काम तातडीने चालू करण्याच्या सूचनाही दिल्या.

या वेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चे उपअभियंता पी.एस्. राऊत, तसेच अन्य अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पहाणीच्या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, तांदुळवाडी हद्दीत महामार्गालगत ३ धोकादायक विहिरी असून त्यांना संरक्षक भिंती आणि कठडे उभारण्याची आवश्यकता आहे, तसेच या परिसरातील अपघातांची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.