नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया संघटनेची चौकशीची मागणी

(नीट – नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट – राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा)
पणजी, २२ जून (वार्ता.) – पेडणे तालुक्यातील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयात घेतलेल्या नीट परीक्षेच्या कालावधीत झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने केली आहे. यासंबंधी या संघटनेचे कुमार गवळी, सदाशिव बडीगेर, हर्ष देसाई आणि झैद शेख या कार्यकर्त्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे, ‘‘आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार परीक्षा कक्ष ‘एजी ०७’ मधील अनुमाने २० उमेदवारांना परीक्षा संपण्याच्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधीच उत्तरपत्रिका लिहिणे थांबवण्यास सांगण्यात आले आणि त्यांच्या प्रश्नपत्रिका अन् उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आल्या. त्याच केंद्रातील इतर वर्गांतील उमेदवारांना अधिकृत वेळ संपेपर्यंत उत्तरपत्रिका लिहिण्याची अनुमती देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने सीसीटीव्ही चित्रीकरण, उपस्थितीची नोंद, परीक्षेची कागदपत्रे आणि परीक्षा दिलेले विद्यार्थी अन् परीक्षा कर्मचारी यांची उत्तरे पडताळून या आरोपांची चौकशी करावी. जर हे आरोप खरे आढळले, तर विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करून योग्य उपाययोजना कराव्यात.’’
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?