
तुळजापूर – श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात वाढती गुन्हेगारी, चोरी, लूटमार आणि अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच्या निषेधार्थ जनहित संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण चालू केले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार शहरात भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि पोलीस उपाधीक्षक नीलेश देशमुख हे कर्तव्यात निष्क्रीय ठरल्याचा आरोप करत त्यांचे तात्काळ स्थानांतर करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ‘जोपर्यंत निष्क्रीय अधिकार्यांवर कारवाई होत नाही आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे. या साखळी उपोषणाला नागरिक आणि व्यापारी वर्गातूनही पाठिंबा मिळत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !