
पंढरपूर – ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’च्या वतीने करण्यात येणार्या श्री विठ्ठल मूर्ती संवर्धन प्रक्रियेसंदर्भात दिवाणी न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश पारित केला आहे. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट करण्यात आले असून त्या अपिलावरील सुनावणी २३ जून या दिवशी होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत २३ आणि २४ जून या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले रहाणार असून दर्शन व्यवस्था पूर्ववत चालू राहील, याची वारकरी, भाविक आणि नागरिक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत