२० किलो ७६० ग्रॅम गांजा जप्त !
राज्य गांजामुक्त कधी होणार ?
मुंबई – भिवंडीतील एका उच्चभ्रू निवासी संकुलातील सदनिकेत धाड घालून पोलिसांनी बॅगेत लपवून ठेवलेला २० किलो ७६० ग्रॅम गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात या गांजाचे मूल्य सुमारे ६ लाख ३२ सहस्र रुपये आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या पुरुष साथीदाराला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
माहीम गडाचे संवर्धन होणार !
राज्यातील सर्वच गडांच्या संदर्भात असा निर्णय व्हावा, असे गडप्रेमींना वाटते !
मुंबई – येथील माहीम गडाला गतवैभव मिळवून देण्यासाठी मुंबई महापालिका आिण सीमाशुल्क विभाग यांनी सामंजस्य करार केला. २० कोटी रुपयांच्या खर्चातून गडाचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाईल.
पुणे येथे मान्सूनचे आगमन : लवकरच मुंबईत येणार !
पुणे – मान्सूनचे पुणे येथे आगमन झाले असून लवकरच मुंबईत प्रवेश करील, असे हवामान खात्याने घोषित केले आहे. मुंबईत प्रतिवर्षी ७ ते ८ जूनच्या आसपास मान्सून येत होता; मात्र यंदा २० जून उलटला तरी मान्सूनचे मुंबईत आगमन न झाल्याने परिस्थिती बिकट झाली होती.

सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर
तुळजापूर येथे निष्क्रीय पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण !
ठाकरे गटाच्या ६ खासदारांचा शिवसेनेत प्रवेश !
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !