राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाने याच्या विरोधात आवाज उठवला असून कर्मचार्‍यांना कामावर घेण्यासाठी तूर्तास एक दिवस ‘कामबंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

निधन वार्ता

निधन वार्ता

राजगुरुनगर केंद्रातील सनातनचे साधक श्री. महेंद्रकुमार भावसार यांचे वडील ईश्वरदास रूपचंद भावसार (वय ८६ वर्षे) यांचे ७ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथील अंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथील अंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला

सध्या केवळ हलक्या वाहनांना या रस्त्यावरून वाहतुकीसाठी अनुमती देण्यात आली असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हा रस्ता चालू झाल्यामुळे प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामस्थांच्या अडचणी सुटल्या आहेत.

सातारा वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांची जागेवरच आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी !

सातारा वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांची जागेवरच आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी !

जे नागरिक बाधित आढळतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिक जागृत होऊन गर्दी टाळतील, मास्कचा उपयोग करतील, सामाजिक अंतर राखतील, अशी आशा आहे. 

खारेपाटण तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय

खारेपाटण तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय

(सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लाखो भाविक विविध मार्गांनी येत असतात. हे प्रशासनाला ठाऊक असूनही तपासणी नाक्यावर आवश्यक तेवढ्या प्रमाणात प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसणे यातून प्रशासनाची नियोजनशून्यता लक्षात येते !

मेढा (जिल्हा सातारा) येथे ६ चंदनचोरांना अटक

मेढा (जिल्हा सातारा) येथे ६ चंदनचोरांना अटक

जावळी तालुक्यातील बामणोली भागातील आपटी गावच्या सीमेमध्ये चंदनाच्या झाडांची अवैध तोडणी करण्यासाठी एक टोळी आली होती; मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मेढा पोलिसांनी ६ चंदनचोरांना अटक केली आहे.

सावंतवाडीतील मोती तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आणलेल्या नौकांचा शुभारंभ

सावंतवाडीतील मोती तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आणलेल्या नौकांचा शुभारंभ

सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी येथील मोती तलावात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे, यासाठी ४ नवीन नौका आणल्या आहेत. या नौकांचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते ७ सप्टेंबर या दिवशी करण्यात आला.

…अन्यथा सातारा नगरपालिकेच्या दारात तीव्र आंदोलन करू ! – शिवसेना

…अन्यथा सातारा नगरपालिकेच्या दारात तीव्र आंदोलन करू ! – शिवसेना

शहरामध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढत आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या चिंताजनक असून पालिकेतील यंत्रणा सुस्तावलेली आहे. ही यंत्रणा कामाला लावा, अन्यथा पालिकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करू, अशी चेतावणी शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण

जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३७४ झाली आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ सहस्र ३४७ झाली आहे.

२० वर्षांनंतर ‘खारेपाटण रोड’ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण

२० वर्षांनंतर ‘खारेपाटण रोड’ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण

खारेपाटण येथे रेल्वेस्थानक व्हावे, यासाठी ‘खारेपाटण रोड रेल्वेस्थानक संघर्ष समिती’ने गेली अनेक वर्षे विविध आंदोलने केली होती. या स्थानकाचा आजूबाजूच्या ५० ते ६० गावांना लाभ होणार आहे.