
सावंतवाडी – मागील १५ दिवसांपासून जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र अप्रसन्नता पसरली आहे. नागरी नोंदणी प्रणाली पोर्टल (सी.आर्.एस्. सिव्हिल रजिस्ट्रेशन पोर्टल) अद्ययावत (अपडेट) करण्यात येत असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जात आहे; मात्र यामुळे नागरिकांची असुविधा होत आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
याविषयी साळगावकर यांनी सांगितले की, जन्मनोंद दाखला हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा अधिकार आहे. शाळा, महाविद्यालयीन प्रवेश, पारपत्र (पासपोर्ट), तसेच आधारकार्डसह विविध शासकीय कामांसाठी त्याची आवश्यकता असते. असे असतांना मागील दोन आठवड्यांपासून दाखले मिळत नसल्याविषयी प्रशासनाकडे विचारणा केली असता, संपूर्ण महाराष्ट्रातील ‘सी.आर्.एस्. पोर्टल’ अपडेट करण्याचे काम चालू असल्याने विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. ‘पोर्टल अपडेट’ करणे आवश्यक असले, तरी शाळा आणि महाविद्यालये चालू होत असतांना नागरिकांना तातडीने दाखले मिळणे आवश्यक आहे. ज्यांच्या जन्मनोंदी उपलब्ध आहेत, त्यांचे दाखले नोंदवह्यांत (रजिस्टरमध्ये) तपासून लेखी स्वरूपात देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. पूर्वी नोंदवह्या तपासून दाखले देण्याची पद्धत होती, त्याच पद्धतीचा अवलंब करून नागरिकांची असुविधा दूर करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी केली आहे.
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !