‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – तरुणांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हर घर योद्धा’ अभियान चालू केले आहे. या अभियानाच्या अंतर्गत वाराणसीतील शिबिर आशापूर येथील श्री कमलाकर चौबे आदर्श सेवा आंतर महाविद्यालय आणि बारागाव येथील शिवपुरी वाटिका सभागृह अशा २ ठिकाणी अन् सैदपूर येथे २ ठिकाणी शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये ३२५ हून अधिक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनीही उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या शिबिरार्थींसाठी एकूण ६ साप्ताहिक स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू केले जाणार आहेत. एकूण ३७ तरुण-तरुणींनी प्रशिक्षक म्हणून उत्तरदायित्व स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली आहे. या वेळी अनेक शिबिरार्थींनी सांगितले, ‘या ७ दिवसांच्या वर्गानंतर आमच्या मनातील भीती नाहीशी झाली.’


वैशिष्ट्यपूर्ण
१. प्रख्यात उद्योजक श्री. विशाल बरनवाल म्हणाले, ‘‘या शिबिराच्या माध्यमातून त्यांना जे प्रेम मिळाले, तसे त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते.’’
२. वाराणसी आणि सैदपूर येथील अनेक धर्मप्रेमींनी प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यात सक्रीय सहभाग घेतला.
३. काही पालक या प्रशिक्षण शिबिरात त्यांच्या मुलांना सोडायला आले होते; पण प्रशिक्षण वर्ग पाहून तेही प्रेरित झाले आणि त्यांनी ७ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला.
४. बडा गावचे प्रमुख श्री. रवींद्र पटेल यांनी शिबिरात सातही दिवस सहभाग घेतला.
५. बडा गावातील श्री. सीताराम अग्रहरी यांनी या शिबिरासाठी आणि पुढे घेण्यात येणार्या साप्ताहिक प्रशिक्षण वर्गांसाठी त्यांची जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली.
६. सैदपूरच्या धर्माभिमान्यांनी नवीन लोकांना आमंत्रित करण्यासाठी सभा आयोजित केल्या, तसेच अनेक ठिकाणी होर्डिंगही लावली.

शिबिरार्थींचे अभिप्राय
१. कु. दिव्यांशी मिश्रा : प्रत्येक तरुणीला या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आम्हाला याविषयी माहिती मिळाली, हे आमचे भाग्य आहे; पण समाजात अशा अनेक तरुणी आहेत ज्या अनभिज्ञ आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना शिक्षित करण्याचे कार्य करू.
२. कु. आर्या मोडनवाल : ज्याप्रमाणे दगडाला हातोड्याने ठोकून मूर्ती घडवली जाते, त्याचप्रमाणे आपल्यालाही घडवले जात आहे, जेणेकरून आपण स्वतःसह राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करू शकू.
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
देवस्थानांच्या भूमी बळकावणारा कायदा महाराष्ट्रात होऊ देणार नाही !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !