
सावंतवाडी – तालुक्यातील सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील पदवीधर शिक्षिका सृष्टी धुरी यांना अतिरिक्त ठरवून त्यांचे अन्यत्र समायोजन करण्याच्या प्रशासकीय निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थ आणि पालक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने या संवेदनशील विषयाकडे पाठ फिरवल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून २३ जूनपासून ‘शाळा बंद आंदोलन’ करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
याविषयी सावंतवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांना २२ जून या दिवशी लेखी निवेदनही देण्यात आले आहे. सध्या या शाळेत २ पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत; मात्र शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संचमान्यतेचा तांत्रिक निकष लावून प्रभारी मुख्याध्यापिका तथा पदवीधर शिक्षिका सृष्टी धुरी यांना अतिरिक्त ठरवण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शाळेत सहावी आणि सातवी इयत्तांची एकूण पटसंख्या २१ असून पुढील वर्षांतही ही संख्या कायम रहाणार आहे. असे असतांनाही केवळ तांत्रिक कारणे पुढे करून शिक्षिका पालटण्याचा घाट घातला जात असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होईल आणि शाळेचा दर्जा खालावेल, असे निवेदनात म्हटले आहे.
गटविकास अधिकारी यांना निवेदन देतांना सरपंच नारायण तुकाराम हिराप, उपसरपंच भरत जयराम गावकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजिरी गावकर, उपाध्यक्ष सखाराम कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य नागेश गावकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला