परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून आरक्षण इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून आरक्षण इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि . . . शोधप्रबंध सादर केले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही वर्षांनी पालटत असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले