परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भ्रष्टाचार, बलात्कार, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी वाढण्याचे मूळ कारण म्हणजे समाजाला सात्त्विक बनवणारी साधना न शिकवणे. केवळ हिंदु राष्ट्रातच रामराज्याची अनुभूती येईल.’
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत निवडून आलेले राजकीय पक्ष ‘चांगले’ म्हणून निवडून आलेले नाहीत, तर इतर पक्षांपेक्षा कमी वाईट म्हणून निवडून आले आहेत !
‘कुठे इंग्लंडहून आलेले मूठभर इंग्रज संपूर्ण भारतावर काही वर्षांतच राज्य करू लागले, तर कुठे स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांच्या काळात दुभंगलेल्या भारतावरही राज्य करता न येणारे शासनकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !’
‘कोणताही पक्ष निवडून आला, तरी भारताची स्थिती आणखीन बिघडणार आहे, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ७४ वर्षांच्या अनुभवावरून जनतेला ज्ञात असल्याने ती निवडणुकीच्या निकालाची नाही, तर हिंदु (ईश्वरी) राष्ट्राच्या स्थापनेची वाट पहात आहे !’
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले