गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी ५ वर्षांची अनुमती मिळणार !

मंडळांनीही योग्य प्रतिसाद द्यावा. वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मूर्ती विसर्जन करतांना उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

राज्यात फुटबॉल विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’सह सामंजस्य करार !

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन अन् जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’या सर्वांत मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

कारी (जिल्हा सातारा) येथील प्रतीक्षा मोरे यांचा ‘शिवछत्रपती’ पुरस्काराने गौरव !

पुणे येथे झालेल्या ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कारी येथील प्रतीक्षा मोरे यांना मल्लखांब खेळातील कामगिरीविषयी ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड येथे दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू !

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ‘शॉर्टसर्किट’मुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर कुटुंब मूळचे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहे.

पू. कालिचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पू. कालिचरण महाराज यांनी केलेल्या भाषणाची ध्वनीचित्र-चकती पोलिसांनी पडताळून पाहिल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा अंतिम आराखडा सिद्ध !

१० वी आणि १२ वी च्‍या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्‍या जाणार असून अकरावी आणि बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांना किमान दोन भाषा सक्‍तीने शिकाव्‍या लागणार आहेत.

५ सहस्र किलो भेसळयुक्‍त पनीरचा साठा पुणे येथे जप्‍त !

भेसळ रोखण्‍यासाठी स्‍वतंत्र कायदे असतांना त्‍याची कठोर कार्यवाही न झाल्‍याचा परिणाम !

‘शककर्ते शिवराय’ हा ग्रंथ लिहिण्‍यासाठी सद़्‍गुरूंचा आशीर्वाद आणि श्री गणेशाची कृपा लाभली ! – सद़्‍गुरुदास विजयराव देशमुख

शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती, ‘राजा शंभू छत्रपती’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती आणि ‘सूर्यपुत्र’ या ग्रंथाची ३ री आवृत्ती या ग्रंथांचे प्रकाशन कोथरूड येथे झाले.

डॉ. कुरुलकर पुन्‍हा पाकसमवेत संपर्क करण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे त्‍यांच्‍या जामिनाला विरोध !

संशोधन आणि विकास संस्‍थेचे संचालक अन् वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्‍तानला शस्‍त्रास्‍त्रे, तसेच क्षेपणास्‍त्रे यांची माहिती दिली. त्‍यांनी त्‍यांच्‍या भ्रमणभाषमधील माहितीही पुसली.