ढोल ताशांच्या गजरात पुणे येथील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना आणि मिरवणूक !

येथे ढोल ताशांच्या गजरात सकाळी ८.३० वाजता मानाचा पहिला आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढत पुण्याचा मानाचा पहिला गणपति विराजमान झाला आहे..

कार्ला (पुणे) येथील ‘एकवीरादेवी देवस्‍थान’ न्‍यासातील २ संचालक हे देवीचे खरे भक्‍त असावेत !

कार्ला येथील प्रसिद्ध ‘एकवीरादेवी देवस्‍थाना’तील २ संचालकांची निवड ही गुप्‍त पद्धतीने करावी. हे संचालक देवीचे खरे भक्‍तच असावेत, असा मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालाला सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती देण्‍यास नकार दिला.

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.

पुणे येथे गणेशोत्‍सवासाठी पी.एम्.पी.एम्.एल्. २७० जादा बसगाड्या सोडणार !

गणेशोत्‍सवातील देखावे पहाण्‍यासाठी शहराबाहेरून आणि शहरांतर्गत नागरिक मोठ्या संख्‍येने घराबाहेर पडतात. त्‍यामुळे बसगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

व्‍हिसा संपूनही पुणे येथे अवैधपणे रहाणार्‍या परदेशी नागरिकांची विशेष शाखेकडून शोधमोहीम चालू !

पुणे – शहरात परदेशी नागरिक शिक्षण आणि व्‍यवसाय यानिमित्त वास्‍तव्‍य करतात. यासाठी ‘स्‍टुडंट व्‍हिसा’ किंवा ‘बिझनेस व्‍हिसा’ घ्‍यावा लागतो. या ‘व्‍हिसा’ची मुदत संपल्‍यावर काही जण मुदत वाढवून काही दिवस वास्‍तव्‍य करतात. अशा नागरिकांवर न्‍यायालयीन कारवाई करून त्‍यांना पुन्‍हा मायदेशी पाठवण्‍यासाठी पुणे शहरात पोलिसांनी अशा नागरिकांची सूची सिद्ध केली आहे. त्‍यानुसार अनुमाने ३२५ नागरिक पुणे शहरात … Read more

गणेशोत्‍सवानिमित्त खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’द्वारे होणारी प्रवाशांची लूटमार थांबवावी !

गणेशोत्‍सवानिमित्त लाखो गणेशभक्‍त स्‍वत:च्‍या गावी जाण्‍यासाठी निघत आहेत. याची संधी साधत ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’ आणि अन्‍य खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ यांच्‍याद्वारे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्‍त तथा प्रवाशांची लूटमार चालू आहे.

हिंदी भाषा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला एका सूत्रात बांधते ! – गृहमंत्री अमित शहा

पुणे येथे तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित केले होते. ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला हिंदी भाषा एका सूत्रात बांधते’, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

‘ट्रॅव्‍हल्‍स’चालकांनी तिकिटाचे भाडे अधिक आकारल्‍यास तक्रार करा !

‘ट्रॅव्‍हल्‍स’चालकांनी तिकिटाचे भाडे अधिक आकारू नये, याविषयीची जरब परिवहन विभाग कधी निर्माण करणार ?

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प कायमस्‍वरूपी हद्दपार करा ! – ठाकरे गटाची मागणी

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍प शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारा असल्‍याने तो मावळ तालुक्‍यातून कायमस्‍वरूपी हद्दपार करावा, अशी मागणी नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.