सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो ! – ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले  

प्राप्त आयुष्यात वाईट कामे करू नका. सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो. देवाला खेचून आणण्याचे बळ आपण केलेल्या पुण्यकार्यात आहे. भूतकाळातील कृत्यांचा विचार न करता पुढील आयुष्यात चांगली कृत्ये करून पुण्य कमवा, असे प्रतिपादन गाथा मंदिर, देहू येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांनी केले.

पुणे विमानतळावर बनावट तिकीटाच्या आधारे प्रवास करणार्‍या धर्मांधाला अटक

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

आधुनिक वैद्य हाळनोर यांनी रक्ताचे नमुने पालटण्यासाठी मिळालेली रक्कम एका विद्यार्थ्याकडे ठेवली होती !

‘डॉ. अजय तावरे यांच्यामुळे मला पैसे मिळाले आहेत. माझ्याकडे कपाट नसल्याने तुझ्याकडे पैसे ठेव. १५ दिवसांनी मी पैसे परत घेईन, असे डॉ. हाळनोर यांनी सांगितले होते, असा जबाब त्या विद्यार्थ्याने पोलिसांसमोर दिला आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय !

जीवनात घडणार्‍या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी केवळ समुपदेशन नाही, तर धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !

पुणे येथे किरकोळ कारणांवरून पोलीस कर्मचार्‍यास शिवीगाळ

किरकोळ कारणांवरून ५ जणांनी पोलीस कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली.

‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत संमत घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी लाच मागणारे कह्यात !

अशा भ्रष्टाचार्‍यांमुळेच कोणताही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

पुणे येथे ‘व्हॉट्सॲप’वर ‘ट्रिपल तलाक’ची नोटीस देणार्‍या पतीविरुद्ध गुन्हा नोंद !

या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती फिरोज अख्तर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोहगाव (पुणे) परिसरात १ कोटीचे मॅफेड्रॉन जप्त !

लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष अबनावे या तिघांना अटक केली.

पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट !

‘पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे’, यासाठी दिलीप खेडकर कर्मचार्‍यांवर दबाव टाकत होते.

पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

अनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासन काय करते ? हे पहाणे आवश्यक !
याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !