पुणे – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तहसीलदार दिलीप आकडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलीस त्याचे अन्वेषण करत आहेत. ‘पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे’, यासाठी दिलीप खेडकर कर्मचार्यांवर दबाव टाकत होते. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी आकडे यांनी ही तक्रार प्रविष्ट केली. आकडे यांना तक्रारीवरील जबाब नोंदवण्यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलावले होते; मात्र कामात व्यस्त असल्याने ते जबाब नोंदवण्यासाठी आले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.