श्री गणेश अथर्वशीर्ष ऑनलाईन संस्कृत अभ्यासक्रमाला पुणे विद्यापिठाकडून मान्यता !

पुणे, १८ सप्टेंबर (वार्ता.)-  संस्कृत ही एखाद्या विशिष्ट वर्गाची भाषा न मानता ती ज्ञानभाषा आहे, असे मानले, तर प्राचीन ऋषिमुनींनी जे ज्ञान संस्कृतमध्ये लिहून ठेवले आहे, ते ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. याच अनुषंगाने संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी श्री गणेश अथर्वशीर्ष ऑनलाईन अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने मान्यता दिली आहे. याविषयी विद्यापिठाच्या कुलसचिवांनी संस्कृत विभागप्रमुखांना पत्र पाठवून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला विद्यापिठाची मान्यता असल्याचे कळवले आहे. तांत्रिक गोष्टींच्या पूर्ततेनंतर विजयादशमीला अभ्यासक्रम सर्वांसाठी उपलब्ध होईल.

संपादकीय भूमिका

पुणे विद्यापिठाचा स्तुत्य उपक्रम ! पाश्‍चात्त्य देशांना या भाषेचे महत्त्व पटले असून तेथील विद्यापिठांमध्ये ही भाषा शिकवली जाते. अन्य विद्यापिठांनीही याचे अनुकरण करावे !