पुणे येथील ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन !

कोरोनाच्या आपत्काळात अशा प्रकारे वैद्यकीय अधिकार्‍यांनी आंदोलन करणे अतीगंभीर आहे !

कोल्हापुरातील जवळपास १० सहस्रांपेक्षा अधिक कामगार गावाकडे रवाना !

कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी परप्रांतीय कामगारांची काळजी घेतली जाईल, असे दिलेले आश्‍वासन फोल ठरल्याचे दिसत आहे.

जागतिक कीर्तीचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एन्.आय.व्ही.) माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे निधन !

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात् एन्.आय.व्ही.चे माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे कोरोना संसर्गामुळे १५ एप्रिल या दिवशी निधन झाले.

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे.

पाटलीपुत्र (बिहार) शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या जागी रुग्णांच्या शरिरात चढवले जात आहे बिसलेरीचे पाणी !

शहरातील दुसरे मोठे रुग्णालय असलेल्या एन्.एम्.सी.एच्.मध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागली आहे.

संभाजीनगर येथे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला अडवल्यावरून आमदार प्रशांत बंब आणि पोलीस यांच्यात वाद !

‘कोविड सेंटर’मध्ये नातेवाइकांना जाऊ दिले जात नसल्याने पोलिसांना शंका आली.

कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर उभारणार

आमदार वैभव नाईक यांच्या फार्मसी कॉलेजची कोविड केअर सेंटरसाठी पहाणी

सिंधुदुर्गातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ सहस्रांहून अधिक

सिंधुदुर्गातील मृत्यू झालेले एकूण रुग्ण २०१

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी

वयाची अट न घालता जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी.

राजकारणी कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता चुकीचा आदर्श जनतेसमोर ठेवत आहेत !  आरोग्य कर्मचारी

मास्क न घातल्याने इतरांना संसर्ग होऊ शकतो, एवढेही समजत नाही ? असे राजकारणी जनहित काय साधणार ?