जागतिक कीर्तीचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एन्.आय.व्ही.) माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे निधन !

 डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे निधन

पुणे, १६ एप्रिल – राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात् एन्.आय.व्ही.चे माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे कोरोना संसर्गामुळे १५ एप्रिल या दिवशी निधन झाले. त्यांचे वय ८३ वर्षे होते. विषाणू विज्ञान, लसीकरण आणि साथरोग या विषयांतील आंतरराष्ट्रीय तज्ञ अशी त्यांची ख्याती होती. ते वर्ष १९८८ ते १९९७ या काळात पुण्यातील एन्.आय.व्ही.चे संचालक होते. वर्ष १९७३ पासून ते राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कार्यरत होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्त्वाच्या वैज्ञानिक सल्लागार गटामध्ये त्यांचा समावेश होता. तुलसी रामायण आणि संस्कृत या विषयांमध्ये त्यांचा व्यासंग होता. डेंग्यू, के.एफ्.टी. आणि चिकनगुनिया, तसेच जपानी एन्सेफलायटिस विषाणू महामारीचा त्यांचा अभ्यास होता. पश्‍चिम भारतातील एच्.आय.व्ही. विषाणू संसर्गाच्या प्रसाराचा त्यांचा सखोल अभ्यास होता.