कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गोवा राज्यात हाहाःकार !

दिवसभरातील ५ मृतांपैकी मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात २ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते.

जैन धर्मियांसह सर्व साधू-संतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे ! – गुजराती समाज महासंघाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सर्व संसार यांचा त्याग करून धर्माची दीक्षा घेणार्‍या साधू, संत, साध्वी यांच्याकडे आधार कार्ड अथवा अन्य कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही.

शिवपुरी (मध्यप्रदेश) येथील कोरोनाबाधित रुग्णाला लावलेला ऑक्सिजन काढल्यामुळे त्याचा मृत्यू !

या रुग्णालयातील संबंधित अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या १० दिवसांपासून प्रतिदिन १ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशामुळे अनेक ठिकाणी आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) परिसरामध्ये पसरत चाललेल्या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवेदन

उंचगावमध्ये मलेरिया सदृश्य रुग्ण आणि तापाचे रुग्ण यांमध्ये वाढ होत असून याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येईल, असा कोणताही आधार आढळून आलेला नाही ! – डॉ. राहुल पंडित, सदस्य, राज्य कृती दल

रेमडेसिवीरमुळे मृत्यूचे प्रमाण न्यून होत नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचाही निष्कर्ष

येरवडा (पुणे) येथील मनोरुग्णालयात ४१ जणांना कोरोनाची लागण !

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील २ क्रमांकाच्या वॉर्डात एकाच दिवशी ३० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ११ महिला रुग्णांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने वॉर्डातील १७० रुग्णांची कोरोना चाचणी केली.

‘पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात दळणवळण बंदी नको’, या गोवा शासनाच्या भूमिकेला केंद्राचा पाठिंबा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात सद्यःस्थितीत दळणवळण बंदी लादलेली नसल्याच्या शासनाच्या भूमिकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.

गोव्यात ४० वर्षांखालील २ रुग्णांसह एकूण चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

‘टिका उत्सवा’चा वापर मतदारांना प्रभावित करण्यासाठी केल्यास ‘टिका उत्सव’ रहित करणार ! – राज्य निवडणूक आयोग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २०० अतिरिक्त खाटांची व्यवस्था

गतवर्षीच्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पहाता आताचे प्रमाण तिप्पट आहे. त्यामुळे कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही.