कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो ! – संशोधन
कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
चीनच्या वुहान शहरातून चालू झालेल्या कोरोनामुळे जगभरात ३ लाख ७९ सहस्र ८० जण बाधित झाले आहेत, तर १६ सहस्र ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ३ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र ही संख्या अल्प असल्याचे आता म्हटले जात आहे.
कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.
२ दिवसांत राज्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
चीनच्या हुबेई प्रांतामध्ये कोरोनामुळे गेल्या ३ मासांपासून असलेली दळणवळण बंदी (लॉकडाऊन) ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे, असे चीनने घोषित केले आहे. हुबेईची राजधानी असलेल्या वुहानमध्ये दळणवळण बंदी उठवल्यावर ११ लाख लोकांना दिलासा मिळणार आहे.
काही आधुनिक वैद्य आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये येणार्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे.
कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.
‘होम क्वारंटाईन’ असलेल्या व्यक्ती दायित्वशून्यपणे घराबाहेर पडत असल्याच्या घटना घडल्यानंतर महापालिकेने पुढचे पाऊल म्हणून ‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या घराच्या दारावर पत्रक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
येथील एका रुग्णाचे ‘सारी’ (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या व्याधीमुळे २४ मार्च या दिवशी निधन झाले. सारी आणि कोरोना यांची लक्षणे समान आहेत.