लोकलमधील वातानुकूलन यंत्र १५ मिनिटे बंद; प्रवासी गुदमरले, महिला बेशुद्ध !

मुंबई – मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वेस्थानकावर वातानुकूलिन लोकलमधील वातानुकूलन यंत्र तांत्रिक अडचणीमुळे १५ मिनिटे बंद पडले होते. त्यामुळे अनेक प्रवासी गुदमरले, तर अनेक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्या. एका प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले. सकाळी ९.२६ वाजता ही घटना घडली.

संपादकीय भूमिका

अशात एखादी दुर्घटना घडली असती, तर त्यासाठी उत्तरदायी कोण ? हे रेल्वे प्रशासनाने सांगावे !