मद्य उत्पादनावरच बंदी हवी !
किराणा दुकानांतून खुलेपणाने वाईन विक्री करण्याचा लहान मुले, विद्यार्थी आणि महिला यांच्यावर काय परिणाम होईल, याचा किंचित्ही विचार सरकारने केलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
किराणा दुकानांतून खुलेपणाने वाईन विक्री करण्याचा लहान मुले, विद्यार्थी आणि महिला यांच्यावर काय परिणाम होईल, याचा किंचित्ही विचार सरकारने केलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
‘विकास, सुधारणा आणि प्रगती यांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यातून महसूल वाढतो’, असे सरकार सांगत आहे; पण या अत्यंत अयोग्य निर्णयाला मंत्रीमंडळातील कुणीही विरोध करू नये, हे देशातील लोकशाहीला अत्यंत लज्जास्पदच आहे.
शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात एका मासात ८०० हून अधिक दारूच्या बाटल्या सापडल्या, अशी माहिती ‘पुणे प्लॉग्गर्स’ या संस्थेने दिली आहे. या घटनेतून तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
काँग्रेसच्या उमेदवारांनी ‘देवतांचे विडंबन करणारे आम्हाला देवीसमोर शपथ का घ्यायला सांगत आहेत ?’ असा प्रश्न विचारून पक्षश्रेष्ठींना खडसावणे अपेक्षित आहे. राजकीय स्वार्थासाठी पक्ष कशा प्रकारे देवतांचा सोयीस्कर वापर करतात,…
स्वत:चे वर्तन शिस्तप्रिय आणि प्रेमभावपूर्ण ठेवले, तर साहजिकच इतरांवर अन् विशेषत: देशाच्या भावी पिढीवर त्याचा परिणाम होतो, हे या शिक्षकाच्या उदाहरणातून शिकता येते.
नाना पटोलेंसारख्या लोकप्रतिनिधींनी आणि राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणे, हे अत्यंत लाजिरवाणे अन् संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.
जर मंदिरांविषयी पुरोगामी म्हणवणार्या संघटनांना कळवळा असेल, तर त्यांनी श्री विठ्ठल मंदिर सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत; कारण लाखो विठ्ठलभक्त श्री विठ्ठल मंदिराला सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त झाल्याचे पहाण्यासाठी आतुरलेले आहेत.
आतापर्यंत राजघराण्यातील अनेक महनीय व्यक्तींनी सातारा नगरपालिकेचा कारभार यशस्वीरित्या हाताळला आहे; मात्र हीच नगरपालिका आता कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेली आहे.
कोल्हापूर येथील नागरिकांनी शहरातील, तर पुणे येथील नागरिकांनी जिल्ह्यातून जाणार्या महामार्गावरील पथकर तीव्र आंदोलन करून पूर्णत: रहित करून घेतले आहेत. यातून पथकर रकमेचे धोरण संपूर्ण राज्यात एकच का नाही ? हा प्रश्न नागरिकांना पडतो.
पर्यटन आणि अतिक्रमण या माध्यमांतून भंग पावणारे पावित्र्य यांमधून पुढील पिढीला कोणता आदर्श देणार ? आपल्या या वारशाची पुढील पिढीला ओळख करून देण्यासाठी आज प्रबोधनाची आवश्यकता आहे.