उत्सवांचे महत्त्व समजून घ्या !

नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यातील श्री दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे ! देवीची कृपा संपादन करून घेण्यासाठी गरबा खेळणे. गरबा खेळतांना आपण स्वतःला विसरून देवीच्या भजनात रममाण होणे, तिला अनुभवणे ! आपल्यातील शक्तीतत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे, ही हिंदु संस्कृती आहे.

नवरात्र : त्यामागील शास्त्र, इतिहास, महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत

तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण, हे अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी अन् महासरस्वती या देवींचे प्रधान गुण आहेत. २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी देशभरात चालू होत असलेल्या ‘नवरात्रारंभा’च्या निमित्ताने नवरात्रीमागील शास्त्र, नवरात्रीचे व्रत साजरे करण्याची पद्धत यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे आणि नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

अनेक शास्त्रांपैकी ‘शस्त्रास्त्रविद्या’ हेही एक शास्त्र होय. विजयादशमीच्या निमित्ताने प्राचीन शस्त्रास्त्रांचे लिखाण देत आहोत. दसर्‍याच्या मुहुर्तावर हिंदूंना शस्त्रास्त्रविद्येचे पुनर्स्मरण व्हावे, हाच हे लिखाण प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे.

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

‘२६.९.२०२२ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.

दसरा (विजयादशमी)

हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

काळ्या रंगाचे कपडे नकोत !

अन्य कोणतेही रंग एकमेकांत मिसळले जातात; पण काळा रंग कधीच मिसळला जात नाही. काळ्या रंगाला अधिक महत्त्व दिले जाणे, यातून धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दिसून येते. आपण नकारात्मक स्पंदने ग्रहण करायची ? कि सकारात्मक स्पंदने ग्रहण करून आनंदी व्हायचे ? हे प्रत्येकाने ठरवावे.

देवीची शक्तीपिठे

देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले.

‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र

पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.