नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
प्राचीन काळात कोणतीही गोष्ट जेव्हा विशिष्ट प्रकारे, विशिष्ट नियमांच्या आधाराने तर्कशुद्धरित्या मांडली जाते, तेव्हा त्याला ‘शास्त्र’ अशी संज्ञा प्राप्त होते. आपल्या पूर्वजांनी पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र, चित्रशास्त्र, गंधशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला दिसतो. या अनेक शास्त्रांपैकी ‘शस्त्रास्त्रविद्या’ हेही एक शास्त्र होय. पूर्वी शल्यचिकित्सेसाठी अशा काही विशिष्ट शस्त्रांचा वापर होत असे. विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. शेतकरी आणि कारागीर हेही आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. त्यानिमित्ताने प्राचीन शस्त्रास्त्रांचे लिखाण देत आहोत. दसर्याच्या मुहुर्तावर हिंदूंना शस्त्रास्त्रविद्येचे पुनर्स्मरण व्हावे, हाच हे लिखाण प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे.
१. धनुर्वेद : शस्त्रास्त्रे आणि युद्ध, रथ, घोडदळ, व्यूहरचना यांविषयीचे एकत्रित ज्ञान ज्या ठिकाणी मिळते, त्याला ‘धनुर्विद्या’ असे म्हणतात.
१ अ. धनुर्वेदाच्या आचार्यांमध्ये परशुरामांचे स्थान महत्त्वाचे आहे.
१ आ. धनुर्वेदाचे चतुष्पाद : मुक्त, अमुक्त, मुक्तामुक्त आणि मंत्रमुक्त
१ इ. धनुर्वेदाची उपांगे : शब्द, स्पर्श, रूप, गंध, रस, दूर, चल, अदर्शन, पृष्ठ, स्थित, स्थिर, भ्रमण, प्रतिबिंब आणि लक्ष्यवेध.
२. युद्धाचे प्रकार : मंत्रास्त्रांद्वारे केले जाणारे युद्ध ‘दैविक’, तोफ वा बंदुकीद्वारे केले जाणारे युद्ध ‘मायिक किंवा आसुर’ आणि हातात शस्त्रास्त्रे घेऊन केले जाणारे युद्ध ‘मानव’ समजले जाते.
३. अस्त्रांचे प्रकार : दिव्य, नाग, मानुष आणि राक्षस
४. आयुधे : धर्मपूर्वक प्रजापालन, साधू-संतांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हे धनुर्वेदाचे प्रयोजन आहे.
४ अ. धनुष्य
४ अ १. धनुष्याचे प्रकार
अ. शार्ङ्ग : तीन ठिकाणी वाकलेले धनुष्य
आ. वैणव : इंद्रधनुष्यासारखे झुकलेले धनुष्य
इ. शस्त्र : एक वितस्ति (१२ बोटांच्या रुंदीएवढे अंतर, म्हणजेच १ वीत.) प्रमाणाच्या बाणांना फेकणारे, दोन हात लांब धनुष्य
ई. चाप : दोन चाप लावलेले धनुष्य
उ. दैविक, मानव आणि निकृष्ट : साडेपाच हात लांब धनुष्य ‘दैविक’, चार हातांचे धनुष्य ‘मानव’ आणि साडेतीन हातांचे धनुष्य ‘निकृष्ट’ मानतात.
ऊ. विविध धातूंपासून बनवलेली धनुष्ये : लोह, रजत, तांबे, काष्ठ
ए. धनुष्याची प्रत्यंचा : धनुष्याची प्रत्यंचा रेशमाने वेढलेली असते आणि ती हरीण, म्हैस किंवा गायी यांच्या स्नायूंपासून वा गवतापासून बनवली जाते. या प्रत्यंचेला केव्हाही गाठ पडणे योग्य नसते.
४ आ. बाण
४ आ १. बाणाचे प्रकार
अ. स्त्री : टोकाकडील भाग जाड आणि पसरट असतो. फार लांबचा पल्ला गाठू शकतो.
आ. पुरुष : पृष्ठभाग जाड असतो. दृढ लक्ष्यभेद करतो.
इ. नपुंसक : एकसारखा असतो. साधा लक्ष्यभेद केला जातो.
ई. मुठींच्या संख्येवरून पडलेले प्रकार : १२ मुठींचा बाण ज्येष्ठ, ११ मुठींचा बाणाला मध्यम, तर १० मुठींच्या बाणाला निकृष्ट समजतात.
उ. नाराच : जे बाण लोहापासून बनवतात, त्यांना ‘नाराच’ म्हणतात.
ऊ. वैतस्तिक आणि नालीक : जवळच्या युद्धात वापरल्या जाणार्या बाणांना ‘वैतस्तिक’ म्हणतात. पुष्कळ दूर किंवा उंच असलेले लक्ष्य साधण्यासाठी वापरल्या जाणार्या बाणांना ‘नालीक’ म्हणतात.
ए. खग : यामध्ये अग्निचूर्ण वा दारूगोळा भरलेला असतो. तो वार्यावर विशिष्ट पद्धतीने फेकल्यास पुन्हा परत येतो.
४ आ २. लक्ष्याचे प्रकार : स्थिर, चल, चलाचल आणि द्वयचल
४ इ. चक्र : सुदर्शनचक्र हे सौरशक्तीवर चालणारे असे चक्र होते, जे लक्ष्यभेद करून चालवणार्याकडे परत येत असे.
४ इ १. चक्राचे उपयोग : छेदन, भेदन, पतन, भ्रमण, शयन, विकर्तन आणि कर्तन
४ ई. कुन्त : कुन्त म्हणजेच भाला. याचा दंड काष्ठापासून, तर टोक हे धातूपासून बनवलेले असते.
४ उ. खड्ग : अग्रपृथु, मूलपृथु, संक्षिप्तमध्य आणि समकाय
४ ऊ. छुरिका : छुरिका म्हणजे सुरी. हिला ‘असिपुत्री’ असेही म्हणतात.
४ ए. गदा : मृद्गर, स्थूण, परिघ इत्यादी प्रकार मानले जातात.
४ ऐ. इतर आयुधे : परशू, तोमर, पाश, वज्र
५. नियुद्ध : युद्धामध्ये जेव्हा सर्व शस्त्रास्त्रे संपतात, तेव्हा योद्धे हातापायांनी युद्ध करतात. यालाच ‘नियुद्ध’ असे म्हणतात.
६. व्यूहरचना : व्यूहरचनेद्वारे सैन्याचे रक्षण केले जाते.
७. दिव्यास्त्रे
७ अ. दैविक : आकाशस्थ विद्युल्लतेचा वापर करून जी शक्ती बनवतात, तिला ‘दैविक’ असे म्हणतात.
७ आ. मायायुद्ध : भुशुण्डी, नातीक इत्यादी आग्नेयास्त्रांनी केलेल्या युद्धास ‘मायायुद्ध’ म्हणतात.
७ इ. यंत्रमुक्त आणि मंत्रमुक्त आयुधे : चतुर्विध आयुधांमध्ये यंत्रमुक्त आणि मंत्रमुक्त आयुधांची गणना धनुर्वेदाच्या चौथ्या पादात केलेली दिसते.
७ ई. अग्नीचूर्ण, म्हणजे दारूगोळ्याचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे.
७ उ. दिव्य अस्त्रे मिळवतांना घ्यावयाची काळजी : ही अस्त्रे मंत्र म्हणून ती समोरच्या शत्रूवर सोडावयाची असतात. यासाठी मंत्रसिद्धी आवश्यक असते. अतिशय ज्ञानी आणि तपःपूत अशा गुरूंकडून त्या मंत्राची, तसेच त्या अस्त्रप्रयोगाची यथासांग दीक्षा घ्यावी लागते.
८. तंत्रशास्त्र : जारण, मारण, वशीकरण इत्यादी अनेक गोष्टींसाठी तंत्रशास्त्र प्रसिद्ध आहे. या सर्वांना आता आपण काळी जादू (black-magic) म्हणतो.’
(संदर्भ : मासिक ‘प्रसाद’, मार्च २०१४)
(सौजन्य : परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी – सनातन संस्था)
देवीपूजनाशी संबंधित अधिक माहितीसाठी वाचा,१. ‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र |