नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
२६ सप्टेंबर २०२२ पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या उत्सवात गरबा, दांडिया, तसेच दुर्गापूजा यांच्या जोडीला श्री महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने अष्टमीला घागरी फुंकण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पुण्यातील एका दांपत्याने घागरी फुंकण्याच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाचे केलेले विज्ञापन नुकतेच वाचनात आले. त्या विज्ञापनात एक वाक्य होते, ते म्हणजे ‘कृपया काळ्या रंगाचे कपडे परिधान करून कुणीही दर्शनास येऊ नये.’ या दांपत्याने समाजाच्या मानसिकतेचा विचार न करता काळ्या रंगाचे कपडे परिधान न करण्याविषयीचा स्पष्ट उल्लेख सूचनेत केला, हा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशी सूचना दिल्यास त्यांच्यावर टीका होऊ शकते; पण त्याविषयीची भीड न बाळगता देवीचा कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यासाठीची त्यांची तळमळ सर्वांनाच शिकण्यासारखी आहे. अर्थातच या सूचनेचा अवलंब सर्वच हिंदूंनी करायला हवा.
सध्याच्या काळात कोणताही कार्यक्रम हा काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याविना पूर्णच होत नाही. एकमेकांच्या गाठीभेटी असोत, कुणाचा वाढदिवस असो, एखादी मेजवानी किंवा समारंभ असो, बहुतांश जण काळ्याच रंगाचे कपडे परिधान करून येतात. ‘काळ्या रंगाचे कपडे घालणे म्हणजे ‘स्टेटस’ (प्रतिष्ठा) किंवा ‘फॅशन’, असे जणू समीकरणच झालेले आहे. त्यामुळे लोकांना त्यात काहीच चुकीचे वाटत नाही. उलट अन्य रंगांचे कपडे परिधान करणार्यांना ‘गावंढळ’ किंवा ‘मागासलेल्या विचारांचे’ असे मानले जाते.
काळा रंग आणि हिंदु धर्मशास्त्र !
हिंदु धर्मशास्त्रानुसार काळा रंग हा त्याज्य मानला जातो. तो रंग तमोगुण घनीभूत करण्यास पोषक आहे. वातावरणातील नकारात्मक स्पंदने ग्रहण करण्याची क्षमता सर्वांत अधिक काळ्या रंगातच असते. त्यामुळे वाईट कृत्ये करण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला जातो. अन्य कोणतेही रंग एकमेकांत मिसळले जातात; पण काळा रंग कधीच मिसळला जात नाही. तो काळाच रहातो. असे असतांनाही काळ्या रंगाला अधिक महत्त्व दिले जाणे, यातून धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दिसून येते. आपण नकारात्मक स्पंदने ग्रहण करायची ? कि सकारात्मक स्पंदने ग्रहण करून आनंदी व्हायचे ? हे प्रत्येकाने ठरवावे.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.