मुंबई विद्यापिठासह राज्यातील तीन संकेतस्थळे ‘हॅक’

पॅलेस्टाईनमधील गटाचा हात

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यातील मुंबई विद्यापीठ, ठाणे पोलीस आणि उत्तन ज्युडिशियल अकादमी ही ३ संकेतस्थळे ‘हॅक’ करण्यात आली आहेत. या प्रकरणी राज्य सायबर विभागाने चौकशी चालू केली असून यामध्ये पॅलेस्टाईन येथील हॅकर्स गटाचा हात असल्याचा संशय आहे, अशी माहिती अतिरिक्त महासंचालक (आर्थिक गुन्हे) मधुकर पांडे यांनी दिली.

देशात धार्मिक तणाव निर्माण झाल्यानंतर गेल्या ३ दिवसांपासून देशभरातील संकेतस्थळे ‘हॅक’ होऊ लागली; परंतु डेटा चोरी झाल्याची तक्रार नाही. या प्रकरणी ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सीईआर्टी) यांच्यासह समन्वय ठेवून पोलीस अन्वेषण करत आहेत. इतर सरकारी यंत्रणांनाही त्यांच्या संकेतस्थळांच्या सुरक्षेची पडताळणी करण्यास सांगितली आहे.

(टीप : ‘हॅक’ म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून संकेतस्थळावरील माहिती चोरणे किंवा संकेतस्थळ बंद पाडणे. असे कृत्य करणाऱ्यांना ‘हॅकर्स’ म्हणतात.)