येत्या २ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता !

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचे सदस्यत्व रहित व्हावे, यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन १-२ दिवसांमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी !

शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांची शिंदे गटाकडून युवासेना राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

शरद पवार यांनी शिवसेना फोडली, हे उद्धव ठाकरे यांना कधी लक्षात येणार ? – शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेना फोडली आहे, हे उद्धव ठाकरे यांच्या कधी लक्षात येणार ? शिवसेनेचे ५० आमदार पक्ष सोडून का गेले ? याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० जुलै या दिवशी सुनावणी होणार !

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय पिठासमोर सुनावणी होईल. या निवाड्यावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सुनावणीमुळे २० जुलैला होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची नवीन कार्यकारिणी घोषित !

शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदी अजूनपर्यंत कुणाचीही नियुक्ती केलेली नाही.

कर्जवसुली करणार्‍या कर्मचार्‍याला धमकावणार्‍या धर्मांधाला अटक !

पोलिसांनी खान याला अटक करून त्याच्याकडून परवाना बंदूक आणि ८ काडतुसे कह्यात घेतली आहेत. परवाना रहित करण्याची प्रक्रिया चालू आहे.

राज्यात कोकणासह मराठवाडा आणि विदर्भ येथे जोरदार पावसाची शक्यता !

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे, तसेच गडचिरोली, गोंदिया यांसह कोकण आणि मुंबई येथे १८ जुलै या दिवशी सकाळपासून संततधार चालू आहे. कोकणासह विदर्भ आणि मराठवाडा येथील बहुतांश जिल्ह्यांत पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बारामती येथील कामांना दिलेली स्थगिती उठवावी !

मुख्यमंत्र्यांनी बारामती येथील कामांना दिलेली स्थगिती उठवावी, तसेच सूडबुद्धीने कोणताही निर्णय घेऊ नये, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह १८ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

मुंबईसह उपनगरांमध्ये सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेला भाविक आणि जिज्ञासू यांची उपस्थिती !

मुंबईसह नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत असलेले विविध गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी जिज्ञासू आणि भाविक यांनी उपस्थित राहून गुरुपूजन अन् अध्यात्माविषयीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त !

राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्रे सिद्ध करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ११ सहस्र ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीत तातडीने साहाय्य करता यावे, यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला नियुक्त करण्यात आले आहे.