नीरव मोदी यांची २५३ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून कह्यात !

महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँकेमधील आर्थिक अपहारातील आरोपी आणि हिर्‍याचे व्यापारी नीरव मोदी यांची २५३ कोटी ६२ लाख रुपयांची ‘हाँगकाँग’मधील मालमत्ता केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील कारागृहात आहेत.

निवडणूक आयोग शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता ! – डॉ. अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

‘शिवसेना कुणाची ?’ हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटाला न देता कायमस्वरूपी गोठवू शकते.

मंत्र्यांचा शपथविधी झाला नसल्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजामध्ये सुस्तपणा !

राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असले, तरी वित्त, गृह, कृषी यांसह सर्व विभागांचे खातेवाटप अद्यापही झालेले नाही. मंत्रालयातील विविध विभागांत प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्री नसल्यामुळे सद्य:स्थितीत जवळजवळ सर्वच विभागांतील कामकाज सुस्तपणे चालू आहे.

दखलपात्र गुन्हा नोंदवणे, हे पोलिसांचे कर्तव्य ! – मुंबई उच्च न्यायालय

दखलपात्र गुन्ह्याचा प्राथमिक माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, अशी टिपणी मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीमध्ये केली आहे.

मुंबईतील दुकाने आणि आस्थापने यांवर मराठी पाट्या लावण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ !

महापालिकेने शहरातील दुकाने आणि आस्थापने यांवर मराठी पाट्या लावण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. महानगरपालिकेने याविषयीची माहिती उच्च न्यायालयात दिली. मुदतवाढ मिळण्याच्या मागणीसाठी हॉटेल मालकांच्या संघटनेने याचिका प्रविष्ट केली होती.

मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनांना टाळे !

मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे दालन वगळता अन्य सर्व मंत्र्यांच्या दालनांना टाळे लावण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणांहून तक्रारी किंवा निवेदने घेऊन येणार्‍या पीडितांच्या समस्या समजून घेण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.

मंत्रीपद मिळवून देण्यासाठी १०० कोटींची खंडणी मागणार्‍या चौघांना अटक !

राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळवून देण्याचे आमीष दाखवून आमदाराकडे १०० कोटी रुपयांची मागणी करणार्‍या २ धर्मांधांसह ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कोट्यवधींचा भूखंड असलेल्या ‘वरळी सी फेस’वरील सरकारची दुग्धशाळा आरे वसाहत येथे हलवणार !

मुंबईतील मध्यवर्ती आणि कोट्यवधी रुपयांचा भूखंड असलेल्या ‘वरळी सी फेस’वरील सरकारची दुग्धशाळा आरे वसाहतीच्या ठिकाणी हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची हीच वेळ ! – भाजपचे आमदार नितेश राणे

नवीन सरकारने याची तात्काळ नोंद घेऊन येणार्‍या पावसाळी अधिवेशनात त्याविषयी विधेयक मांडून प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने पाऊल टाकावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

आर्थिक अपहाराच्या प्रकरणी तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

‘नर्मदा नवनिर्माण अभियान ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे करण्यात येणारी सामाजिक कार्ये आणि आदिवासी मुलांचे शिक्षण, यांसाठी प्राप्त झालेला निधी पाटकर यांनी विकास प्रकल्पांच्या विरोधासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.