मुंबई – आता महाराष्ट्रात भगवाधारी सरकार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आणि इतर काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची हीच वेळ आहे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून केली आहे. ‘आपण भोळ्या महिलांना यामध्ये (धर्मांतरामध्ये) अडकण्यापासून आणि त्यामध्ये होणार्या छळापासून वाचवले पाहिजे’, असेही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रातही धर्मांतर विरोधी कायदा आणला पाहिजे- नितेश राणेhttps://t.co/kO83R1ONeA < येथे वाचा सविस्तर वृत्त#Maharashtra #AntiConversionLaw #EknathShinde #DevendraFadnavis #NiteshRane @NiteshNRane @BJP4Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/m2iGbGjAvb
— LoksattaLive (@LoksattaLive) July 21, 2022
संपादकीय भूमिकाधर्मांतरबंदी कायद्याची मागणी करणारे भाजप आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन ! नवीन सरकारने याची तात्काळ नोंद घेऊन येणार्या पावसाळी अधिवेशनात त्याविषयी विधेयक मांडून प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने पाऊल टाकावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! |