महाराष्ट्र राज्य सरकारकडून उंच इमारतींच्या अग्नीसुरक्षेसाठी १३ वर्षांनी समिती स्थापन !

अग्नीसुरक्षेच्या संदर्भात अधिसूचना काढल्यावर १३ वर्षांनंतर अग्नीसुरक्षेसाठी समिती स्थापन केली जाणे, इतकी उदासीनता आतापर्यंतच्या सरकारांकडून अपेक्षित नाही !

पठाण’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या मुलाखतीत अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून पुन्हा पाकिस्तानप्रेम व्यक्त !

वारंवार पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेमी जनतेने त्यांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावे !

राज्यात अतीवृष्टीमुळे १२६ जणांचा मृत्यू !

या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील ४४ घरांचे पूर्णत:, तर ३ सहस्र ५३४ घरांची अंशत: हानी झाली आहे. अतीवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यातील १२६ नागरिकांनी स्वत:चे प्राण गमावले आहेत. १ जूनपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्हे आणि ३५२ गावे प्रभावित झाली.

अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दादर (मुंबई) येथे पदवीदान समारंभ पार पडला !

‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’च्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या कीर्तनकारांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रात मराठी शाळांची दुरवस्था, तर उर्दू शाळांना मात्र भरमसाठ अनुदान !

मराठीप्रेमींनो, मराठी शाळांची दुःस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांनाही अनुदान मिळावे, यासाठी कृतीशील व्हा !

शिर्डी येथून आतंकवाद्याला अटक !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.

न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच, असे नाही ! – धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय

जिल्हा न्यायालयांमध्ये ४ कोटी, उच्च न्यायालयांमध्ये १ कोटीहून अधिक आणि सर्वोच्च न्यायालयात ७२ सहस्र खटले प्रलंबित आहेत.

राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानाच्या रकमेत १५० कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री 

राज्यातील ग्रंथालयांना थकित अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल. राज्यातील ग्रंथालयांना १२२ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. ते अनुदान १५० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल.

मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आता मुंबईकरांसाठी काम करणार्‍यांना आपण निवडून आणायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईत दहीहंडी उत्सवात १५३, तर ठाणे येथे ६४ गोविंदा घायाळ !

दहीहंडी उत्सवात १९ ऑगस्ट या दिवशी दिवसभरात मुंबई येथे १५३ गोविंदा घायाळ झाले होते. त्यांपैकी १३० जणांना उपचार करून सोडून देण्यात आले, तर उर्वरित २३ जण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.