राज्यात अतीवृष्टीमुळे १२६ जणांचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील ४४ घरांचे पूर्णत:, तर ३ सहस्र ५३४ घरांची अंशत: हानी झाली आहे. अतीवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यातील १२६ नागरिकांनी स्वत:चे प्राण गमावले आहेत. १ जूनपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्हे आणि ३५२ गावे प्रभावित झाली. येथे ११७ तात्पुरती निवारा केंद्रे सिद्ध करून २० सहस्र ८६६ नागरिकांना या केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती साहाय्य दलाच्या १५ तुकड्या राज्यातील पूरग्रस्त भागांत साहाय्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत.