मुंबई – ‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’च्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या कीर्तनकारांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दादर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. गोवा येथील कीर्तनकार ह.भ.प. मुकुंदराज मडगांवकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात डॉ. अशोकराव मोडक आणि गोवा येथील कीर्तनकार ह.भ.प. मुकुंदराज मडगांवकर यांची प्रवचनेही झाली.
१. कीर्तन विशारदाचे प्रात्यक्षिक प्रथम पारितोषिक ह.भ.प. अक्षय आयरे आणि ह.भ.प.(सौ.) गीतांजली तावडे यांना विभागून देण्यात आले.
२. द्वितीय पारितोषिक ह.भ.प. अक्षता गाडे आणि ऋता पात्रीकर यांना विभागून दिले गेले. लेखी परीक्षेतील प्रथम पारितोषिक ह.भ.प. मंदाकिनी तारळेकर आणि ह.भ.प. (सौ.) तृप्ती चौगुले यांना विभागून देण्यात आले.
३. अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे प्रमुख विश्वस्त रवींद्र आवटी, कार्यवाह किशोर साठे, ह.भ.प. भालचंद्र पटवर्धन, ह.भ.प. विजयाताई वैशंपायन, ह.भ.प. (सौ.) उमाताई तेंडोलकर, कोषाध्यक्ष माधव खरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका मधुरा प्रभू-अनारेडी यांनी केले.
कीर्तनातून समाजजागृती झाली पाहिजे ! – रवींद्र आवटी, प्रमुख विश्वस्त, अखिल भारतीय कीर्तन संस्थातरुण मंडळींना कीर्तनामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. ‘अखिल भारतीय कीर्तन संस्था’ हा विचार प्रत्यक्षात राबवत आहे. कीर्तनातून समाजजागृती झाली पाहिजे. हा वसा घेऊन अखिल भारतीय कीर्तन संस्था कार्य करत आहे. |