पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघड !

मुंबई आणि गुजरात येथे काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा २ सहस्र कोटींहून अधिक असू शकतो. कर्णावतीसह गुजरातमध्ये करचोरीसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत.

आतंकवादी याकुब मेनन याच्या कबरीचे मुंबईत उदात्तीकरण !

महाराष्ट्राच्या राजधानीत अशी घटना घडणे, हे लज्जास्पद ! एवढे होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन काय करत होते ?

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याकडून विज्ञापनातून महिला मच्छिमारांचा अवमान !

नयना पाटील पुढे म्हणाल्या, ‘‘वर्षा उसगावकर यांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. २ वेळेच्या जेवणासाठी जिवाचे रान करणार्‍या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अवमान आहे.”

मुंबई येथे मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्ल्यूू आजारांच्या रुग्णांत वाढ !

यंदा पावसाळा संपत असतांना मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्ल्यू या साथींच्या आजारात वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी या आजारांच्या रुग्णांची मोठी नोंद झाली आहे.

तोकड्या कपड्यांत दर्शनासाठी आलेल्या गायिकेला पूर्ण कपडे परिधान केल्यावर दर्शनाची अनुमती !

गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्याविषयी जागृत असलेल्या ‘आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव समिती’चे अभिनंदन !

ट्रॅकमन्समुळे रेल्वेचा अपघात टळला

कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी)  प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. ५ सप्टेंबर या दिवशी मुंबईत आल्यावर भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते.

वांद्रे (मुंबई) आणि बंगाल येथून संशयित जिहादी कह्यात

बंगाल स्पेशल टास्क फोर्स एस्.टी.एफ्. पोलिसांनी मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने केलेल्या कारवाईत ३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी सद्दाम हुसेन खान (वय ३४ वर्षे) याला मुंबईतील निर्मलनगर, वांद्रे परिसरातून आणि समीर हुसेन शेख (वय ३० वर्षे) याला बंगालमधून अटक केली.

‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळील समुद्रात विसर्जनाला ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ची अनुमती !

गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्रकिनार्‍यांसह आरे कॉलनी आणि इतर ठिकाणच्या तलावांवर विसर्जनाची सिद्धता केली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ

पत्राचाळ भूमी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांना आर्थर रोड कारागृहात रहावे लागणार आहे.