मुंबई येथे मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्ल्यूू आजारांच्या रुग्णांत वाढ !

मुंबई – यंदा पावसाळा संपत असतांना मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्ल्यू या साथींच्या आजारात वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी या आजारांच्या रुग्णांची मोठी नोंद झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबई येथे ४ सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ८९ रुग्ण, लेप्टोचे ६, डेंग्यूचे २९, गॅस्ट्रोचे ३८, हेपेटायसिसचे ४, चिकनगुनियाचा १, तर एच् १ एन् १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या ३ रुग्णांची नोंद झाली आहे.